बाजारभाव

बाजार भाव: कांदा 1500 तर सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये बुधवारी सोयाबीनला 5500 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये काल 43 साधनांतून एकूण 670.55 क्विंटल कांद्याची आवक झाली.

 

त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1500 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 600 ते 950 व नंबर 3 कांदा 200 ते 550 तसेच गोल्टी कांदा 450 ते 600 असे बाजारभाव निघाले आहेत.

 

भुसार मार्केटमध्ये एकूण 28 क्विंटल शेतमालाची आवक झाली असून गव्हाची 4 क्विंटल आवक होऊन 2300 तर सोयाबीनची 15 क्विंटल आवक होऊन 5100 ते 5500 व सरासरी 5300 रुपयेक्विंटल असे बाजारभाव निघाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button