बाजारभाव

बाजार भाव: कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्यास 1551 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले आहेत. नं. 1 रु 1400 ते 1551, नं.2 ला रु. 1101 ते 1400, नं. 3 ला रु. 800 ते 1151, गोल्टी रु. 551 ते 851, खाद रु. 150 ते 500 प्रमाणे बाजारभाव मिळाले आहेत. 3807 कांदा गोणीची आवक झाली.

 

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. लिलाव वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूंनी घ्यावी.

 

शेतकरी बंधूनी कांदा विक्रीस आणताना 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button