बाजारभाव

बाजार भाव: ‘या’ बाजार समितीत कांदा, डाळिंबाला मिळतोय चांगला भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याच्या 21 हजार 631 गोण्यांची आवक झाली. कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला.

 

एक नंबर कांद्याला 1400 ते 1800 रुपये बाजारभाव मिळाला. तर दोन नंबर कांद्याला 950 ते 1350, तीन नंबर कांद्याला 400 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 17120 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 ते 155 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button