बाजारभाव

बाजार भाव: कांदा, डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल (रविवार) कांद्याच्या 14567 गोण्यांची आवक झाली. कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 950 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 800 ते 1000 रुपये, जोड कांदा 100 ते 300 रुपये.

 

डाळिंबाच्या 12826 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 188 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button