बाजारभाव

बाजार भाव: ‘या’ मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण

अहमदनगर – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कांद्याच्या आवकेत 10 हजार गोण्यांनी वाढ झाली तर जास्तीत जास्त भावात 300 रुपयांची घसरण झाली. काल 69 हजार 437 गोण्या कांद्याची आवक झाली.

 

बुधवारच्या तुलनेत ती 10 हजार गोण्यांनी कमी आहे. काल एक-दोन लॉटला 3100 ते 3200 रुपयांपर्यंत भाव निघाले. बुधवारी भाव 3500 पर्यंत निघालेले होते. मोठा कलरपत्ती कांद्याला 2700 ते 3000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2600 ते 2850 रुपये, गोल्टा कांद्याला 1800 ते 2200 रुपये, गोल्टी कांद्याला 1400 ते 1750 रुपये, जोड कांद्याला 600 ते 900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हलक्या डॅमेज कांद्याला 300 ते 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button