बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीन डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल (मंगळवारी) सोयाबीनला 6125 रुपये तर कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 13861 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1101 तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 701 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 550 ते 750 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 6020 रुपये, जास्तीत जास्त 6121 रुपये, तर सरासरी 6070 रुपये. गव्हाला कमीत कमी 2309 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, तर सरासरी 2405 रुपये. हरभरा कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 4609 रुपये, तर सरसरी 4000 रुपये भाव मिळाला. मकाला सरसरी 2449 रुपये भाव मिळाला. तर ज्वारीला सरसरी 1626 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 11204 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 ते 257 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button