बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल गुरूवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला 6080 रुपये भाव मिळाला. तर लुज कांद्याला 1411 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

लूज कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1051 ते 1411 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 701 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 351 ते 700 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 17230 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 111 ते 165 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 5160 रुपये, जास्तीत जास्त 6080 रुपये तर सरासरी 6000 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2475 रुपये भाव मिळाला. हरभरा कमीत कमी 4402 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त 4608 रुपये तर सरासरी 4500 रुपये क्विंटल. ज्वारी सरासरी 2050 रुपये प्रतिक्विंटल, बाजरी कमीत कमी 2325 रुपये प्रतिक्विंटल, जास्तीत जास्त 2680 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button