बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर – काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीन ला 5282 रुपये भाव मिळाला.

 

राहाता बाजार समितीत कांद्याच्या 19587 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1200 तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 5099 रुपये, जास्तीत जास्त 5282 रुपये, तर सरासरी 5200 रुपये. गव्हाला सरासरी 2500 रुपये. हरभरा सरासरी 4281 रुपये भाव मिळाला. बाजरीला कमीत कमी 2109 रुपये, जास्तीत जास्त 2692 रुपये तर सरसरी 2500 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 11441 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 126 ते 230 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button