अहमदनगर

बाजार भाव: कांदा, सोयाबीन डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर -राहाता बाजार समितीत काल लूज कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. लूज कांद्याला प्रतिक्विंटलला 1400 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला 6170 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला 1051 ते 1400 रुपये, कांदा नंबर 2 ला 701 ते 1050 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 700 रुपये, असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 6000 रुपये, जास्तीत जास्त 6170 रुपये सरासरी 6100 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2479 रुपये भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2117 रुपये, जास्तीत जास्त 2440 रुपये तर सरासरी 2275 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 7514 क्रेट्सची आवक झाली.

 

डाळिंब नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 121 रुपये, तर जास्तीत जास्त 180 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button