बाजारभाव
बाजार भाव: कांदा, सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात आज शनिवार (दि. 23) रोजी झालेल्या कांदा लिलावात 8 हजार 331 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 100 ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 700 ते 1095 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 695 रुपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 80 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपये भाव मिळाला. भुसारमालात बाजरी 2500 रुपये, गहू 2625 रुपये व सोयाबीन 5700 ते 6000 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.