बाजारभाव
बाजार भाव: कांदा, गहू, हरभरा, डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव
अहमदनगर – राहाता बाजार समितीत आज (सोमवार) लूज कांद्याची मोठी आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 1225 रुपये इतका भाव मिळाला.
कांदा नंबर 1 ला 1001 ते 1225 रुपये, कांदा नंबर 2 ला 751 ते 1000 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये, असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
गव्हाला कमीत कमी 2328 रुपये, जास्तीत जास्त 2523 रुपये तर सरासरी 2425 रुपये, हरभरा कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 4251 रुपये तर सरासरी 4125 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाच्या 13533 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 151 रुपये, तर जास्तीत जास्त 205 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.