अहमदनगर
बाजार भाव: सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर – शनिवारी राहाता बाजार समितीत सोयाबीन प्रतिक्विंटलला 5625 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5625 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला.
हरभरा सरासरी 3601 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2951 रुपये मिळाला. मकाला कमीत कमी 1836 रुपये, जास्तीत जास्त 1990 रुपये तर सरासरी 1900 रुपये असा भाव मिळाला.