बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, कांदा, डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर – राहाता बाजार समितीत काल सोमवारी सोयाबीनला कमीत कमी 6050 रुपये, जास्तीत जास्त 6200 रुपये तर सरासरी 6150 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2137 रुपये, हरभरा सरासरी 4536 रुपये, तर मुगाला सरासरी 4349 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 13357 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 151 रुपये तर जास्तीत जास्त 260 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला,

राहाता बाजार समितीत काल मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 901 ते 1252 रुपये, कांदा नंबर 2 ला 601 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला 301 ते 600 रुपये, असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button