बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल बुधवारी सोयाबिनला सरासरी 6170 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

बुधवारी सोयाबीनला कमीत कमी 6000, जास्तीत जास्त 6170 रुपये तर सरासरी 6100 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला कमीत कमी 2278 रुपये, जास्तीत जास्त 2337 रुपये, तर सरासरी 2300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळींबाच्या 10014 क्रेटस ची आवक झाली.

 

डाळींब नंबर 1 ला 136 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 96 ते 135 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 51 ते 95 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button