बाजार भाव: सोयाबीन डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात शनिवारी सोयाबीनला कमीत कमी 6000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 6050 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 6025 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 8 क्विंटल आवक झाली.
तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात गव्हाची 1 क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी 2050 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बाजरीची 1 क्विंटल आवक झाली. बाजरीला सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
डाळिंबाच्या 11832 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.