बाजारभाव

बाजार भाव: ‘या’ दोन बाजार समितीत कांद्याला किती मिळतोय भाव

अहमदनगर- मागील आठवड्याच्या तुलनेत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याचे भाव जवळपास 200 रूपयांनी घसरले असून आवकही वाढली. सोमवार झालेल्या कांदा लिलावात 26 हजार 183 कांदा गोण्याची आवक झाली.

 

एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 600 रूपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार 295 रूपये तर तिन नंबरचा कांदा 100 ते 895 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 900 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 81 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रूपये रूपये भाव मिळाला.

 

राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 12506 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1300 तर जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला.

 

कांदा नंबर 2 ला 750 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 650 ते 850 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button