बाजारभाव

बाजार भाव: कांदा आवक घटली; भाव स्थिर

अहमदनगर – काल सोमवारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 10 हजार 670 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 400 ते 1 हजार 800 रूपये, दोन नंबरचा कांदा 1000 ते 1 हजार 395 रूपये, तर तिन नंबरचा कांदा 100 ते 1000 रूपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 1000 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 86 कांदा गोण्यांना 2 हजार रूपये तर 49 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रूपये भाव मिळाले.

 

 

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी 45 हजार 526 गोण्या आवक झाली. शनिवारच्या तुलनेत आवकेत 15 हजार गोण्यांनी घट झाली. जास्तीत जास्त भाव 1700 रुपयांपर्यंत स्थिर राहिले.

 

एक-दोन लॉटला 1500 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा कांद्याला 700 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 600 रुपे, जोड कांद्याला 200 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button