बाजारभाव

बाजार भाव: कांद्याची आवक वाढली; भावात घसरण

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी शनिवारच्या तुलनेत आवकेत 45 हजार गोण्यांनी वाढ झाली. लिलावासााठी एकूण 95 हजार 319 गोण्या कांदा मार्केटमध्ये आलेला होता.

 

जास्तीत जास्त भावात 100 रुपयांनी घसरण झाली. एक-दोन लाटला 1500 ते 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1250 ते 1350 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला 500 ते 700 रुपये, गोल्टी 450 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button