बाजारभाव

बाजार भाव: ‘या’ बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; भाव स्थिर

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत 6 हजार गोण्यांनी वाढ झाली तर जास्तीत जास्त भाव स्थिर होते.

 

सोमवारी कांद्याची 85 हजार 292 गोण्या (46 हजार 911 क्विंटल) इतकी आवक झाली. शनिवारच्या तुलनेत ती 6 हजार गोण्यांनी अधिक आहे. एक-दोन लॉटला 1600 ते 1800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1400 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1200 ते 1350 रुपये, गोल्टा कांदा 800 ते 900 रुपये, गोल्टी 500 ते 800 रुपये, जोड कांदा 200 ते 400 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button