बाजारभाव

बाजार भाव: मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या भावात घसरण

अहमदनगर – नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 100 रुपयांची घसरण झाली. जास्तीत जास्त भाव 1600 रुपयांपर्यंत निघाले. सोमवारी 73 हजार 699 गोण्या (40 हजार 534 क्विंटल) आवक झाली.

शनिवारच्या तुलनेत ती 21 हजार 475 गोण्यांनी कमी होती. एक-दोन लॉटला 1500 ते 1600 रुपये क्विंटल भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1250 रुपये भाव मिळाला.

गोल्टा कांद्याला 800 ते 1050 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 850 रुपये, जोड कांद्याला 200 ते 650 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button