बाजारभाव

बाजारभाव: कांदा, सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल (मंगळवारी) सोयाबीनला जास्तीत जास्त 6315 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला तर कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला.

 

काल बाजार समितीत 21 हजार 465 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 900 ते 1100 रुपये भाव, तर जोड कांद्याला 100 ते 300 रूपये भाव मिळाला.

 

डाळींबाच्या 6400 क्रेटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 121 ते 177 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबिनला कमीत कमी 6250 रुपये, जास्तीत जास्त 6315 रुपये तर सरासरी 6285 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला कमीत कमी 2120 रुपये, जास्तीत जास्त 2198 रुपये, तर सरासरी 2160 रुपये भाव मिळाला अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button