बाजार भाव: कांदा, सोयाबीन, गहू, बाजरी, हरभरा, मूग
अहमदनगर – कोपरगाव बाजार समितीत काल शनिवारी कांद्याची 16 हजार 240 क्विंटल आवक झाली. यावेळी झालेल्या लिलावात ओपन कांद्याला 1474 रुपये बाजार भाव मिळाला.
एक नंबर कांद्याला 1474 ते 1125 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 1100 ते 775 रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला 750 ते 500 रुपये भाव मिळाला.
तसेच शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवार येथे शनिवारी ओपन कांद्याला 1330 रुपये भाव मिळाला असुन 9 हजार 820 क्विंटल आवक झाली. एक नंबर कांद्याला 1330 ते 1000 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 975 ते 700 रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला 675 ते 350 रुपये भाव मिळाला.
भुसार शेतीमालाचे बाजारभाव – गव्हाला सरासरी 2411 रूपये क्विंटल भाव मिळाला.बाजरीला सरासरी 2550 रूपये भाव मिळाला. हरबर्याला सरासरी 4631 रूपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 5741रूपये भाव मिळाला. मुगाला सरासरी 6182 रूपये भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक एन. जी. ठोंबळ यांनी दिली आहे.
कोपरगांव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी आलेले असल्याने कांद्यास चांगले बाजारभाव मिळत असुन शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार समिती शिरसगांव-तिळवणी येथे विक्रीस आणावा असे आवाहन सचिव एन. एस.रणशुर यांनी केले आहे.