बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व भुसार मार्केटमध्ये सोमवारी भुसार मार्केटमध्ये एकूण 82 क्विंटल मालाची आवक झाली. यामध्ये सोयाबीनची 55 क्विंटल आवक होऊन 5000 ते 5750 व सरासरी 5450 बाजारभाव मिळाला.

 

कांद्याला 2500 रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची 13477 गोणीतून एकूण 7322-05 क्विंटल आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1700 ते जास्तीत जास्त 2500 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 150 ते 1650 व नंबर 3 कांदा 300 ते 900 तसेच गोल्टी कांदा 900 ते 1350 तसेच एक्ट्रॉ सुपर काद्याची 153 गोणी आवक होऊन 2700 व 70 गोणीसाठी 2600 रुपये क्विटल असे बाजारभाव निघाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button