बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात गुरूवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात 14 हजार 712 कांदा गोण्याची आवक झाली.

 

एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 605 ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 105 ते 1 हजार 600 रुपये, तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार 100 रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 700 ते 1100 रुपयेे भाव मिळाला. अपवादात्मक 17 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रुपये, 33 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रुपये 107 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रुपये, 56 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रुपये तर 62 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये भाव मिळाला.

 

भूसार मालात गहू 2 हजार 251 रुपये ते 2 हजार 900 रुपये, मका 1 हजार 951 रुपये ते 1 रुपये 960 रुपयेे तर सोयाबीन 5 हजार रुपये ते 5 हजार 500 रुपयेे याप्रमाणे भाव मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button