बाजारभाव

बाजार भाव: ‘या’ बाजार समितीत कांद्यासह सोयाबीनचे भाव घसरले

अहमदनगर- श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व भुसार मार्केटमध्ये सोयाबीनची 14 क्विंटल आवक होऊन 5300 ते 5400 व सरासरी 5350 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले.

 

कांद्याला 1650 असा भाव मिळाला. येथे कांद्यासह सोयाबीनचे भाव काल घसरलेले दिसून आलेे. कांदा मार्केटमध्ये काल दि. 17 रोजी 72 साधनातून एकूण 932-44 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1100 ते जास्तीत जास्त 1650 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 700 ते 1050 व नंबर 3 कांदा 250 ते 650 तसेच गोल्टी कांदा 700 ते 1050 असे बाजारभाव निघाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button