अहमदनगर

अल्पवयीन मुलीचा विवाह; दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हा

अहमदनगर- बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावरील वस्तीवर अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गुप्त माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळाली होती.

 

निरीक्षक कर्पे यांनी शिंगणापूरचे ग्रामसेवक व पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले.

 

याबाबत शिंगणापूरचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी दादासाहेब नारायण बोरुडे यांनी फिर्याद दिली की दि. 24 रोजी दुपारी 1 वाजता मुलगी 18 वर्ष वयापेक्षा कमी असल्याचे माहित असूनही बालविवाह लावला.

 

यावरून आरोपी लहू बाळासाहेब कल्हापुरे, बाळासाहेब धोंडीराम कल्हापुरे, उषाबाई बाळासाहेब कल्हापुरे (तिघेही रा. खडांबे ता. राहुरी) ज्ञानदेव निवृत्ती काळे, सुरेखा ज्ञानदेव काळे (रा. शिंगणापूर ता. नेवासा), बाबासाहेब सखाहारी जाधव (रा. बोधेगाव ता. शेवगाव), वैभव बाळासाहेब शुक्रे (रा. वांजोळी ता. नेवासा) यांच्यावर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 149/2022 बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. माळवे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button