Maruti Alto Discount : घाई करा ! मारुती अल्टोवर मिळतोय सर्वाधिक परवडणारा डिस्काउंट, होईल मोठी बचत…
तुम्ही तुमची बजेट कार स्वस्तात घरी घेऊन येऊ शकता. कारण मारुती अल्टोवर सर्वाधिक परवडणारा डिस्काउंट मिळत आहे.

Maruti Alto Discount : गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारात सर्वात जास्त खरेदी केलेली कार ही मारुती अल्टो आहे. सर्वसामान्य लोकांनी या कारला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. कमी बजेटमध्ये व कमी खर्चात ही कार चालते. त्यामुळे नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात ही कार खरेदी करत आहे.
दरम्यान ही स्वस्तात मस्त अशी परवडणारी कार आहे. जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याच्या नियोजनात असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात भारी संधी आलेली आहे. यामध्ये तुम्ही डिस्काउंटसह ही कार खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुमचे खूप पैसे वाचणार आहेत.
दरम्यान, आता ही संधी तुमच्यासाठी देखील आलेली आहे. Arena आणि Nexa मालिकेतील काही मारुती सुझुकी डीलर्स या महिन्यात निवडक मॉडेल्सवर सूट देत आहेत. हे फायदे रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट या स्वरूपात मिळू शकतात. यामध्ये मारुती अल्टोच्या नावाचाही समावेश आहे.
प्रकारानुसार जुलै 2023 सवलत यादी
अल्टो पेट्रोल एमटी व्हेरियंटवर 40,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळते. CNG MT व्हेरियंटवर 20,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
तसेच मारुती अल्टो K10 चे पेट्रोल AMT प्रकार 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहे. अशा प्रकारे या ऑफरअंतर्गत तुम्ही तुमच्या स्वप्नातील ही कार घरी घेऊन येऊ शकता.
अल्टो ही कार किती सुरक्षित आहे?
एप्रिलमध्ये, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये अल्टोला दोन-स्टार रेटिंग मिळाले आहे. गेल्या वर्षी क्रॅश चाचणी अहवालात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याला शून्य रेटिंग मिळाले होते. तसे म्हटल्याप्रमाणे मॉडेलच्या बॉडी शेलला स्टॅटिक रेट केले गेले आहे. नवीनतम नियमांचे पालन करण्यासाठी भारतीय ब्रँडची एंट्री-लेव्हल हॅचबॅक एप्रिल 2023 मध्ये अपडेट करण्यात आली आहे.