टेक्नॉलॉजीताज्या बातम्या

Maruti Suzuki Ignis : स्वातंत्र्यदिनी मारुतीच्या ‘या’ कारवर मिळेल बंपर डिस्काउंट, वाचतील 69,000 रुपये; घ्या असा लाभ

स्वातंत्र्यदिनी, मारुती सुझुकी त्यांच्या मिड सेगमेंट फॅमिली कारपैकी एकावर बंपर सूट देत आहे. ही कार 20.89 kmpl मायलेज देणारी आहे.

Maruti Suzuki Ignis : जर तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण स्वातंत्र्यदिनी, मारुती सुझुकी त्यांच्या मिड सेगमेंट फॅमिली कारपैकी एकावर बंपर सूट देत आहे.

ही कार मारुती सुझुकी इग्निस आहे. तुमच्या फॅमिलीसाठी ही एक उत्तम कार असून तुमच्यासाठी ही खूप परवडणारी कार आहे. आता तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी आलेली आहे.

5000 हजार रुपये स्क्रॅप सूट मिळेल

31 ऑगस्टपर्यंत कंपनी या कारवर 35,000 हजार रुपयांची रोख सवलत, 25,000 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5,000 हजार रुपयांची स्क्रॅप सूट आणि 4,000 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. ही कार बाजारात सात प्रकार येते.

सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन कलर पर्याय

ही कार बाजारात 5.84 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून उपलब्ध आहे. यात सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन कलर पर्याय आहेत. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी इग्निसमध्ये सात इंची स्क्रीन आहे. हा टचस्क्रीन स्टायलिश लुकसह येतो. मारुती सुझुकी इग्निसमध्ये 1197 सीसी इंजिन आहे, हे पेट्रोल इंजिन उत्तम कामगिरी करते.

कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध

मारुती सुझुकी इग्निसचे टॉप मॉडेल 8.16 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. यात एअरबॅग्ज आणि एबीएस सारखे सेफ्टी फीचर्स आहेत. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारखे फीचर्स कारमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि डीआरएल याला डॅशिंग लुक देतात.

मारुती सुझुकी इग्निसमध्ये मागील पार्किंग सेन्सर्स

कारमधील शक्तिशाली पेट्रोल इंजिन 81.8 Bhp ची उच्च शक्ती देते. मारुती सुझुकी इग्निसला 20.89 kmpl चा मायलेज मिळतो. या कारमध्ये रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. ज्यामुळे कार बॅक करणे सोपे होते. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो.

रस्त्यावर 113 Nm पीक टॉर्क निर्माण करते

मारुती सुझुकी इग्निस रस्त्यावर 113 Nm पीक टॉर्क निर्माण करते. कारचे मायलेज 20.89 kmpl आहे. हे EBD सह चार ट्रिममध्ये ऑफर केले जात आहे. ही कार बाजारात टाटा टियागो, मारुती वॅगनशी स्पर्धा करते. अशा प्रकारे तुमच्या परिवारासाठी नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही मारुती सुझुकी इग्निस या कारचा विचार करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button