ताज्या बातम्या

Maruti Suzuki Invicto : मारुती सुझुकीच्या नवीन एमपीव्ही ‘इन्व्हिक्टो’ कारचे बुकिंग सुरु! ५ जुलै रोजी भारतात होणार लॉन्च, पहा किंमत

मारुती सुझुकी कंपनीकडून आता त्यांची पहिलीच महागडी कार लॉन्च करण्यात येणार आहे. इन्व्हिक्टो ही एमपीव्ही कार ५ जुलै रोजी भारतात होणार लॉन्च केली जाणार आहे.

Maruti Suzuki Invicto : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक कार विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीकडून आता त्यांची आणखी एक नवीन कार लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीकडून आजपासून इन्व्हिक्टो’चे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा Nexa डीलरशिपवर 25,000 रुपये भरून तुम्ही ही कार बुक करू शकता.

मारुती सुझुकी कंपनीकडून ग्राहकांना आता आणखी एक कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कारचे नाव मारुती सुझुकी इनव्हिक्टो आहे. ५ जुलै रोजी कंपनीकडून ही MPV कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार मारुती टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसची रिबॅज केलेली आवृत्ती असणार आहे.

या कारचे बुकिंग आजपासून म्हणजेच १९ जूनपासून सुरु करण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की ही कार 2.0l पेट्रोल आणि 2.0l स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल पर्यायासह लॉन्च केली जाऊ शकते.

तसेच या कारची किंमत इनोव्हा हायक्रॉसपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मारुती सुझुकी पहिल्यांदाच त्यांची सर्वात महागडी कार लॉन्च करणार असल्याचे दिसत आहे.

मारुती सुझुकी कंपनीकडून १३ जून रोजी या कारच्या नावाची घोषणा केली आहे. ही प्रीमियम एमपीव्ही टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या आधारित बनवली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक दमदार फीचर्स असलेली कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो किंमत

मारुती सुझुकी इनव्हिक्टो कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 18.55 लाख ते टॉप मॉडेलची किंमत 29.99 लाख आहे. या कारची स्पर्धा टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी असणार आहे.

इंजिन आणि गिअरबॉक्स

इनव्हिक्टो या कारमध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 174 PS पॉवर आणि 205 NM टॉर्क जनरेट करते. ही कार 16 kmpl चे मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त, कारला एक TNGA 2.0-लीटर चार-सिलेंडर हायब्रिड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळेल, ज्यामध्ये सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक मोटर आहे, जी ई-सीव्हीटीशी जोडलेली आहे. हे इंजिन 186 पीएस पॉवर आणि 206 एनएम टॉर्क जनरेट करते. हायब्रिड इंजिनसह 21.1 kmpl चे मायलेज मिळेल.

इंटीरियर आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कंपनीकडून या कारमध्ये अनके दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचा डॅशबोर्ड लेआउट इनोव्हा हायक्रॉससारखा देण्यात आला आहे. या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक मोठा पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि पॉवर्ड टेलगेट सारखी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.

कारमध्ये तीन रांगांसह कॅप्टन सीटचा पर्याय देखील मिळेल. सुरक्षेसाठी, 6 एअरबॅग्ज, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान केली जाणार आहेत.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button