Maruti VS Hyundai : स्विफ्ट कार की ह्युंदाई i20! मध्यमवर्गीय लोकांसाठी यातील कोणती कार आहे सर्वोत्तम? सविस्तर जाणून घ्या
Hyundai ने अलीकडेच आपल्या i20 च्या नवीन अपडेटेड व्हर्जनचे अनावरण केले आहे. त्याचबरोबर स्विफ्ट ही कंपनीची जास्त मायलेज देणारी कार आहे.

Maruti VS Hyundai : भारतीय बाजारात गेले अनेक वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणारी कार ही मारुती स्विफ्ट आहे. ही कार मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तर दुसरी ह्युंदाईची i20 ही देखील मोठ्या प्रमाणात मागणी असणारी कार आहे.
स्विफ्ट इलेक्ट्रिकमध्ये येणार आहे
Hyundai ने अलीकडेच आपल्या i20 च्या नवीन अपडेटेड व्हर्जनचे अनावरण केले आहे. त्याचबरोबर स्विफ्ट ही कंपनीची जास्त मायलेज देणारी कार आहे. त्याची सीएनजी आवृत्ती काही महिन्यांपूर्वी सादर करण्यात आली आहे. त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन 2024 मध्ये येऊ शकते. जाणून घ्या या वाहनांची वैशिष्ट्ये आणि किंमत.
मारुती स्विफ्ट
कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये 30.90 km/kg मायलेज देते. कार 113 Nm टॉर्क जनरेट करते. या शक्तिशाली कारची पॉवर 90 पीएस आहे. ही कार एक्स-शोरूम 5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. मारुती स्विफ्टची पेट्रोल आवृत्ती 22.38 kmpl मायलेज देते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही देण्यात आले आहेत.
कार चार प्रकारात येते
या 5 सीटर स्टायलिश कारच्या टॉप मॉडेलची किंमत 9.03 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. तसेच या कारमध्ये ड्रायव्हर सीट आणि बूट स्पेस 268 लिटर आहे. मारुती स्विफ्ट ही कार स्टार्ट/स्टॉप बटणासह येते.
कंपनीने यामध्ये 10 कलर ऑप्शन्स दिले आहेत. कार चार प्रकारात येते. यात ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.
2023 Hyundai i20
या शक्तिशाली कारमध्ये सुरक्षिततेसाठी अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) आहे. यामुळे रस्त्यावर अपघाताचा धोका असल्यास ही कार चालकाला अलर्ट जारी करते. ही कार 1-लिटर पेट्रोल इंजिनसह येते.
Hyundai i20 मध्ये ब्लाइंड स्पॉट आणि स्मार्ट क्रूझ कंट्रोल सारख्या अॅडव्हान्स उपलब्ध आहेत. कारमध्ये 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
तसेच ही कार 172 Nm टॉर्क निर्माण करते. कारमध्ये सुधारित एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स, क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन अव्हायडन्स वॉर्निंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. कारमध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. सध्या बाजारात उपलब्ध Hyundai i20 ची सुरुवातीची किंमत 7.46 लाख रुपये आहे.