अहमदनगर

दीड कोटीच्या स्टील चोरीत मास्टरमाईंड गजाआड

स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्याबाजारात विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पसार असलेल्या मास्टरमाईंडला गजाआड केले आहे.

रामभाऊ सानप (मूळ रा. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. अहमदनगर) असे त्या आरोपीचे नावे आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी पहाटे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर दोन ठिकाणी छापेमारी करून तब्बल दीड कोटी रूपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 जणांना पोलिसांनी अटक केली होती.

हॉटेल निलकमल शेजारी असलेल्या पत्र्यांच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत राजसिंगानिया राजेश्वर सिंगानिय, राहुलकुमार कोलई राव, राजेश राव रामफेर हे रामभाऊ सानप याच्या सांगण्यावरून अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरून जाणार्‍या स्टील (असारी) वाहतूक करणार्‍या वाहन चालकांशी संगनमत करून चोरी करत होते.

छापा पडताच रामभाऊ सानप पसार झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button