अहमदनगर

पोलिसांकडून मस्जिद व मंदिराच्या ट्रस्टींची बैठक; केले ‘हे’ आवाहन

नगर शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात जातीयवादी पोस्ट व्हायरल होत आहेत. यातून जातीय तेढ निर्माण होत आहे.

तसेच आंबेडकर जयंतीदिनी घडलेली घटना व राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जातीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी मस्जिद व मंदिरांच्या ट्रस्टीसह काही संघटनांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.

राज्यात सुरू असलेले राजकारण व त्यातून निर्माण होत असलेला तणाव, तसेच नगर शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या अनुचित व जातीयवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी ही बैठक घेतली.

शहरात जातीय तणाव निर्माण होईल, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे. यातून सर्व समाजाला, नगरकरांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा घटनांमधून युवकांची पिढी उध्दस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चुकीचे व अफवा पसरविणारे संदेश व्हायरल केले जात असून, भविष्यातील घटना टाळण्यासाठी आपापल्या समुदायातील नागरिक व युवकांना शांततेचे आवाहन करावे.

अशा घटनांमधून निर्माण होणारा धोका, भविष्यातील कायदेशीर अडचणी याबाबत युवक व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button