अहमदनगर
केडगावकरांना एक दिवसाआड पाणी दया – मनपाच्या महासभेत नगरसेवक मनोज कोतकर यांची मागणी

केडगाव उपनगर हे नगर शहराचे एक महत्त्वाचे उपनगर आहे या ठिकाणी नागरी वसाहत झपाट्याने वाढत आहे त्यामुळे लोकसंख्या या भागातील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे केडगावचा विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे सर्व भागाला मुबलक प्रमाणात एक दिवसाआड पाणी उपलब्ध करून द्यावे
तसेच अमृत पाणी योजनेचे काम जलद गतीने मार्गी लावावे व केडगावकरांना अमृतपाणी योजने अंतर्गत जास्त दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे आता केडगावकरांना पाच ते सहा दिवसांनी पाणी उपलब्ध होते
त्यामुळे केडगावकरांना पाण्याच्या त्रासाला मोठ्याप्रमाणात सामोरे जावे लागते त्यामुळे लवकरात-लवकर केडगावचा पाणीप्रश्न मार्गी लावावा या मुद्द्यासाठी नगरसेवक मनोज कोतकर मनपाच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक झाले.