Meta Al Chatbot : मस्तच ! आता व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरण्याचा आनंद होणार दुप्पट; जाणून घ्या मोठे कारण
देशात सर्वात जास्त वापरली जाणारी व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम आणि फेसबुक ही माध्यमे आहेत. आता तुम्ही याचा दुप्पट आनंद घेऊ शकता.

Meta Al Chatbot : देशात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करत आहेत. ही माध्यमे देशात सर्वात जास्त वापरली जाणारी आहेत. मनोरंजनासाठी याचा सर्वात जास्त वापर होतो.
अशा वेळी टेक जायंट मेटाने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनी वेगवेगळ्या सेवा आणि वैशिष्ट्यांसह वापरकर्त्यांना खूश करण्यात व्यस्त आहे. या सीरिजमध्ये मेटाही खूप पुढे सरकत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणेनंतर कंपनीने आता आपली AI उत्पादने बाजारात आणली आहेत.
तसेच कंपनीने मेटा कनेक्ट 2023 या कार्यक्रमात ही उत्पादने सादर केली आहेत. कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क येथील मेटा च्या मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अधिक खास बनला आहे कारण यामध्ये कंपनीने अनेक एआय उत्पादनांबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तुम्ही या घोषणा जाणून घ्या.
ही AI उत्पादने कशी काम करतील ते जाणून घ्या
या कार्यक्रमादरम्यान, मेटाने आपले पहिले जनरेटिव्ह एआय उत्पादन सादर केले, असे म्हटले जात आहे की ते एआय चॅटबॉट आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ते एआय पॉवरसह फोटो-रिअलिस्टिक प्रतिमा आणि चॅटबॉट मजकूर प्रतिक्रिया दोन्ही तयार करू शकते.
आणि Meta चा नवीन AI चॅटबॉट – Meta हा AI सारखाच आहे जो वापरकर्त्यांना प्रश्नांची उत्तरे देणे, मजकूर तयार करणे आणि भाषांचे भाषांतर करणे यासारख्या विविध कामांमध्ये मदत करू शकतो.
नवीन Meta AI चॅटबॉट लवकरच WhatsApp, Messenger, Instagram, Ray-Ban Meta Smart Glasses आणि Quest 3 वर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
माहितीनुसार, या एआय चॅटबॉटमध्ये लामा 2 लार्ज लँग्वेज मॉडेलवर आधारित कस्टम मॉडेल वापरण्यात आले आहे, जे जुलैमध्ये सार्वजनिक व्यावसायिक वापरासाठी मेटाने डिझाइन केले होते. दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या बिंग सर्च इंजिनसोबतच्या पार्टनरशिपमधून चॅटबॉटला रिअल-टाइम माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.