MHT CET : फार्मसी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर अशी असेल प्रवेश प्रक्रिया

MHT CET 2021 :- महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल 27 आक्टोबरला जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 12 नोव्हेंबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021 दरम्यान सुरु राहील.
पहिली गुणवत्ता यादी 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
एमएचटी सीईटी परीक्षा आणि नीट परीक्षेचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना डी.फार्म आणि बी. फार्म अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीसीबी गटात 45 तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीसीबीमध्ये 40 गुण मिळणं आवश्यक आहे.
प्रवेशासाठी नोंदणी करणं आवश्यक
महाराष्ट्रातील महाविद्यालयांतील बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी https://ph2021.mahacet.org/StaticPages/frmImportantDates या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 12 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. तर, 12 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी नजीकच्या सुविधा केंद्रात करणं आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
फार्मसी अभ्यासक्रमासाठी नोंदणी: 12 ते 21 नोव्हेंबर
पहिली गुणवत्ता यादी जाहीर : 24 नोव्हेंबर
पहिल्या गुणवत्ता यादीवरील आक्षेप : 25 ते 27 नोव्हेंबर
अंतिम गुणवताता यादी : 28 नोव्हेंबर
महाविद्यालय पसंतीक्रम :29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
प्रवेश निश्चिती : 4 ते 6 डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे: 7 डिसेंबर
महाविद्यालय प्राधान्य क्रम भरणे : 8 ते 10 डिसेंबर
प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे : 13 ते 15 डिसेंबर
महाविद्यालयनिहाय रिक्त प्रवेश : 16 ते 23 डिसेंबर
शैक्षणिक वर्षाला सुरुवात : 6 डिसेंबर
प्रवेशाचा कट ऑफ : 23 डिसेंबर
प्रवेशाची माहिती अपलोड करणे : 24 डिसेंबर