अहमदनगर

मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार प्रकरण; आता ‘हे’ अधिकारी करणार तपास

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नितीन शिरसाठ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इतर आरोपी बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे व ऋषिकेश शेटे अद्यापही पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपअधीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button