अहमदनगरची प्रेयसी, मुंबईचा प्रियकर ! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्याकांड प्रकरणात नक्की काय घडलं वाचा संपूर्ण स्टोरी ! Mira road Crime News

Mira road Crime News :- मुंबई म्हणजे लाखो लोकांची स्वप्ननगरी… डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन लाखो लोक ह्या माया नगरीत येत असतात. यातून काही छोट्या-मोठ्या गुन्हेगारी घटनाही घडत असतात. पण गेल्या घडलेल्या घटनेने देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अक्षरश: हादरली आहे. मीरा-भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीच्या ‘जे’ विंगमधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही निर्घुण घटना घडली. या इमारतीतील घरात मनोज साने (वय 56) आणि त्याची लिव इन पार्टनर मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघे राहत होते. 2017 पासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं.
अहमदनगरच्या महिलेची रेशन दुकानावर ओळख आणि…
अहमदनगरच्या असलेल्या एका महिलेची रेशन दुकानावर झालेली ओळख, दहा वर्षांचं प्रेम आणि त्यानंतर तीची हत्या आणि तुकडे अशा भयंकर घटना या प्रकरणात घडल्या आहेत.मुंबईच्या मिरारोडमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील मिरा-भाईंदर येथे खून करून तुकडे केलेली ३२ वर्षीय मुलगी नगरची असल्याचे समजते. तिने नगरमधील बालिकाश्रम येथे शिक्षण घेतले होते. ती १० वर्षांपूर्वी नगर सोडून मुंबईला गेली होती. तिच्या खुनाच्या तपासासाठी मुंबई पोलीस नगरला आले होते.
अहमदनगरच्या जानकईबाई आपटे अनाथाश्रमात..
बोरीवलीच्या शिधा वाटप दुकानात मनोज साने काम करत होता. २०१४ मध्ये तेथे त्याची ओळख सरस्वती वैद्य बरोबर झाली. ती अनाथ होती. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. सरस्वती अहमदनगरच्या जानकईबाई आपटे अनाथाश्रमात रहात होती. पोलीस तेथून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हत्येनंतर मनोज साने एकदम शांत असून तो पोलिसांची दिशाभूल करत आहे. सरस्वतीने विष प्राशन केल्यानंतर मी घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तो सांगत आहे. आरोपी मनोजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत सरस्वती वैद्य हिनं 4 जूनला विष पिऊन आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस आपल्याला कारणीभूत पोलीस ठरवतील या भितीनं त्यानं मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची ही शक्कल लढवली. मात्र पोलिसांनी प्रथमदर्शनी आरोपी विरोधात भादवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं काही मृतदेहाचे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. त्या तुकड्यांचा शोधही पोलीस आता घेणार आहेत.
अशी झाली होती दोघांची भेट
मनोज हा पूर्वी बोरीवली येथे राहत होता. 2014 पासून तो बोरीवलीच्या एका रेशनिंग दुकानात काम करायचा. तिथेच त्याची सरस्वतीशी ओळख झाली. सरस्वती ही बोरीवलीच्या अनाथालयात होती. तिचे आई-वडील नाहीत. तर मनोजचेही आई-वडील नाहीत. बोरीवली येथे त्याचे चुलते राहतात. मनोजनं 2017 साली मिरारोडच्या गीता आशादिप येथे रुम भाड्यानं घेतला होता आणि तिथे दोघे लिव इन रिलेशिनशिपमध्ये राहत होते. मनोज साने आणि सरस्वती या दोघांची भेट २०१४ मध्ये एका रेशनच्या दुकानावर झाली होती. रेशन दुकानात झालेली ही ओळख पुढे वाढली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सरस्वती अनाथ होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं त्यानंतर हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. माहितीनुसार १० वर्षांपासून जास्त काळ हे दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते. मात्र सरस्वतीला मनोजच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते.
मनोज सानेच्या घरात काय होतं?
गीता- आकाशदीप बिल्डिंगमध्ये राहाणाऱ्या इतर रहिवाशांनी मनोज आणि सरस्वती राहात असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याचे सांगितले. याबाबत नया नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. फ्लॅट नंबर ७०४ मधून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजारच्या एका तरुणाला त्याच्या आईने सांगितलं की जरा जाऊन विचार त्यांना काय झालंय, उंदिर वगैरे मेलाय का. तेव्हा त्यांचा मुलगा गेला आणि त्याने दार ठोठावलं. पण, कुणीही प्रतिसाद दिला नाही. तेवढ्यातच आतून रुमफ्रेशनर मारत असल्याचा आवाज येऊ लागला. मुलाने दाराला कान लावून पाहिलं तर रुमफ्रेशनर मारत असल्याचा आवाज येऊ लागला. मग, मुलगा आईला येऊन म्हणाला की ते दार उघडत नाहीये. त्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास मनोज साने हा तयार होऊन घरातून निघाला. त्याने हेल्मेट घातलेलं, मास्क लावलेला, त्याच्याकडे एक बॅग देखील होती.
तो घरातून बाहेर पडला तेव्हा देखील घरातून खूप तीव्र दुर्गंधी येत होती. त्यानंतर त्याने टाळं लावलं आणि निघून गेला. मनोज सानेसोबत त्याची लिव्ह इन पार्टनरही त्याच फ्लॅटमध्ये राहत होती. पण, मनोजने घराला टाळं मारल्याने शेजाऱ्यांचा संशय बळावला. त्यानंतर थेट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा त्याचं दार उघडलं तेव्हा घरातील दृश्य पाहून सारेच हादरुन गेले होते.किचनच्या बकेटमध्ये मानवी शरीराचे अवयव ठेवलेले होते. पण, ते नेमके कोणते अवयव होते हे काही कळत नव्हतं. एका बकेटमध्ये मांडीचा भाग असल्यासारखं दिसत होतं.
फ्लॅटमध्ये महिलेचे पाय पोलिसांना सापडले, त्यानंतर घरातल्या एका बादलीत आणि पातेल्या महिलेचं धड आणि शीर यांचे तुकडे होते. कुकरमध्ये ते शिजवून लपवण्यात आले होते. काही भाजलेले तुकडेही पोलिसांना आढळून आले आहेत. वुड कटरच्या वापराने त्याने लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक केले. काही तुकडे कुकरमध्ये शिजवले. या सगळ्या तुकड्यांची तो विल्हेवाट लावत होता.
असा होता मनोजचा स्वभाव
मनोज साने हा तीन वर्षांपासून सोसायटीत राहायला आला होता. मात्र त्याचं नावही अनेकांना माहित नव्हतं. तसंच तो फार कुणाशी संवाद साधत नव्हता, सणासुदीलाही तो कुणाशी संवाद साधत नव्हता. त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्याने विचारणा केली. त्यावेळी त्याने रुम फ्रेशनर घरात मोठ्या प्रमाणावर मारला आणि त्यानंतर निघून गेला. त्यामुळे लोकांचा संशय बळावला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
१६ जून पर्यंत पोलीस कोठडी
लिव्ह इन मध्ये राहणार्या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे कऱणार्या मनोज साने याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, तातडीने तपास सुरू करत आरोपी मनोज साने याला अटक करण्यात आली. आज आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.