Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरआमदार लंके म्हणतात : माझा आजही विश्‍वास बसत नाही 'मी' आमदार आहे...

आमदार लंके म्हणतात : माझा आजही विश्‍वास बसत नाही ‘मी’ आमदार आहे म्हणून….!

Ahmednagar News : राजकाणात काय व्हायचे ते होईल. बऱ्याच लोकांनी तर्क, वितर्क काढले. २०२४ चे रणशिंग मुंबईमधून फुंकणार. लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करणार. राजकारण सुरू असते. समयसे पहिले और भाग्यसे अधिक किसीको कुछ नही मिलता. राजयोग असेल तर झोपेत असेल तरी मिळेल.

काहींनी रात्रंदिवस आपटली तरी काहीच होत नाही. हे महत्वाचे आहे. काय व्हायचे ते होईल. एव्हडे मिळाले तेच बोनस मिळाले आहे. मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते की ग्रामपंचायत सदस्य होईल. आमदार झालो. साडेचार वर्षे झाले तरी आजही विश्‍वास बसत नाही आमदार आहे म्हणून.

अशी भावना व्यक्त करत जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात असा सवाल करतानाच बिगर पैशावाल्यामुळे पैशावाल्याला घाम फुटलाय. पैशावाले फार आहेत.पैशावाले पैशावाल्यांना घाबरत नाहीत,बिगर पैशावाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, चार साडेचार वर्षापूर्वी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मला आमदारकीची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.

माझ्या विजयामध्ये मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे, हे मी कधी विसरणार नाही. माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात माझा मुंबईतील सहकारी गावाकडे आला. गावाकडे थांबून दोन रूपये खर्चही केले. मी साठ हजार मतांच्या फरकाने विजयी झालो त्याचे श्रेय मुंबईकरांना जात असल्याचे सांगत. मुुंबईमधील सहकाऱ्यांमध्ये नेहमीच तत्परता पहावयास मिळते.

कोरोना संकटात जीवा भावाच्या सहकाऱ्यांनी मोठे काम केले. मी भाग्यवान आहे मला जीवा भावाचे सवंगडी मिळाले. माझ्या आई वडिलांप्रमाणेच जीवापाड प्रेम करणारे सहकारी मला मिळाले. राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments