आमदार निलेश लंके म्हणाले या तालुक्याचा आमदार मी ! दुसर्याचे पोरग आमच म्हणण्याची…

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मतदारसंघांमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने जलसंधारणाच्या साठी बंधारे आणि केटीवेअर गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात बांधले.
मतदार संघातील शाळांची दुरुस्ती आणि नव्याने वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. गावोगावी व्यायाम शाळा बांधण्यात आल्या. पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. याशिवाय पर्यटन विकासाला चालना देण्यात आली.
इतर अनेक कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला. मागील महिन्यापर्यंत 500 कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. अर्थसंकल्प अधिवेशनातही या मतदारसंघासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात यश मिळाले असल्याचेही आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.
मतदारसंघात आपण अनेक विकास कामे मार्गी लावली परंतु ही कामे आम्हीच आणली असे काही जणांकडून सांगितले जाते आहे. दुसर्याचे पोरगं हे आमचेच आहे.
असे सांगण्याची त्यांना सवय आहे. या तालुक्याचा आमदार मी आहे. मग निधी मी आणेल की पडलेले आणतील असा टोला आमदार निलेश लंके यांनी नाव न घेता माजी आमदार औटी यांना लगावला.
धोत्रे येथील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी लंके बोलत होते. पुढे बोलताना लंके म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत मध्ये पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी 500 कोटींपेक्षा जास्त निधी आणण्यात यश मिळाले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास शंभर कोटी रुपये मतदार संघाच्या विकासाच्या पदरात पाडण्यात यश आले असल्याचे आ. लंके यांनी सांगीतले.