अहमदनगर

आमदार संग्राम जगताप म्हणाले शहरांत ठिकठिकाणी सौर पथदिवे बसवण्याच्या संकल्प

सोलर पथदिव्यांच्या माध्यमातून विजेची बचत होऊन आर्थिक फायदा होण्यास मदत होते.केंद्र व राज्य सरकार सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे,सौर ऊर्जेमुळे दिवस भर वीज निर्मिती होऊन रात्री हे पथदिवे प्रकाशमय होतात, शहरांत ठिकठिकाणी सौर पथदिवे बसवण्याच्या संकल्प आहे.

जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे वीज नसल्यामुळे दफनविधीसाठी मोठी अडचण निर्माण होत होती. स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे साहेबांन जाहगीरदार यांच्या प्रयत्नातून सोलर पथदिवे बसवण्यात आले. भविष्य काळामध्ये सोलर पथदिवे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष साहेबान जाहगीरदार यांच्या प्रयत्नातून जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे सोलर पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा आमदार जगताप यांच्या हस्ते झाला.

यावेळी अब्दुल सलाम, मुजाहिद कुरेशी, वाहिद हुंडेकरी, जिशन शेख,रउफ हाजी, अकिल हाजी, अब्दुल खोकर, शाहनवाज शेख, शाहरुख शेख,वसीम शेख उपस्थित होते. मौलाना अब्दुल सलाम म्हणाले,जलालशाह व तंबोली कब्रस्तान येथे रात्रीच्या वेळी लाईटचे सुविधा नसल्यामुळे दफनविधी करताना मोठी अडचण निर्माण होत होती

हा प्रकार माजी नगरसेवक सचिन जाधव व साहेबान जहगीरदार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आमदार जगताप यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावला. आमदार जगताप हे शहर विकासाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवत आहे, समाजहिताचे कुठलेही काम सांगितल्यानंतर ते सोडवण्यास आमदार जगताप प्राधान्य देत असतात असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button