अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर शिरूर महामार्गावरील खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक

नगर पुणे महामार्ग बनविणाऱ्या - चेतक एंटरप्रायजेस कंपनीकडून आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनेक वेळा निवेदन देण्यात आले; परंतु उपाययोजना केल्या जात नाहीत.

नगर- शिरूर महामार्गावरील खड्डे व विविध मागण्यांसाठी पारनेर मनसेच्या वतीने छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुपा टोलनाक्यावर मंगळवार, दि. ३१ रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

नगर पुणे महामार्ग बनविणाऱ्या – चेतक एंटरप्रायजेस कंपनीकडून आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनेक वेळा निवेदन देण्यात आले; परंतु उपाययोजना केल्या जात नाहीत.

महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

Advertisement

सुविधांची वानवा असताना सुपा टोलनाक्यावर वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप मनसेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी केला आहे.

नगर-पुणे महामार्गावरी खड्डयांची दुरूस्ती करावी, सुपा मुजाबा हॉटेल ते सुपा बसस्थानक चौकापर्यंत डिव्हायडर बसविण्यात यावे, अनाधिकृतपणे तोडलेले डिव्हायडर बुजवून संबंधितांवर कारवाई करावी,

महामार्गावर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, रोडवर पांढऱ्यापट्या माराव्यात, नारायणगव्हाण येथील अपघाती क्षेत्र तसेच पवारवाडी घाटातील अपघाती वळणावर पर्याय काढणे,

Advertisement

पवारवाडी वळणावरील लाइट पोल हलवण्यात यावा, महामार्गावरील साइटपट्या भरण्यात याव्यात, गावाच्या नावांचे फलक तसेच वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलके, शाळा,

हॉस्पिटलसंदर्भात सुचना फलक लावण्यात यावेत, स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चेतक एंटरप्रायजेसच्या वतीने उद्या खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका मनसेच्या कार्यकत्यांनी घेतली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement

उपोषणात मनसे माथार्ड कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार, मनसे सहका- अविनाश पवार, सेना जिल्हाध्यक्ष नितिन म्हस्के वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर,

मनसे तालुक उपाध्यक्ष सतीश म्हस्के, तालुक उपाध्यक्ष रवीश रासकर, भ्रष्टाचा जनआक्रोशचे जिल्हाध्यक्ष योगे‍ कुलथे, सहकार सेना तालुकाध्यक्ष अमोल वाबळे, सहकार सेन तालुका उपाध्यक्ष पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button