अहमदनगर

मोठी बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर ‘या’ ठिकाणी होणार गुन्हा दाखल …

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेत मशिदीवरील भोंग्याप्रकरणी आपली रोखठोक भूमिका मांडली होती.

यामुळे राज्यात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आजच कारवाई होणार असल्याची शक्यता आहे.

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांना देखील पोलिसांनी घरी जाऊन नोटीस पाठवली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींना नोटिसा पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या आहेत.

पोलीस महासंचालकांनी दिला इशारा घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी करत आहेत. औरंगाबाद पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button