लेटेस्ट

मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांना आशिया आणि युरोपमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशी सूचना केली आहे.

सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितलं आहे.

“दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

यावेळी राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं,” असं भूषण यांनी पत्रात सांगितलं आहे.

करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे.

पत्रात पुढे ते म्हणालेत की, राज्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची आठवण करुन दिली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button