अहमदनगर

‘मोक्का’ गुन्हा दाखल होताच पळाले; पोलिसांनी दोघांना जेरबंद केले

अहमदनगर- मोक्का व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेल्या अभिषेक ऊर्फ भोर्‍या अरविंद भिंगारदिवे व गणेश नवनाथ काळे (दोघे रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागापूर बस स्थानक परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

 

 

अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांना सात जणांनी 17 मार्च, 2022 रोजी फोन करून नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे बोलून घेतले होते. त्या सात जणांनी अल्ताफ यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अल्ताफ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अभिषेक भिंगारदिवे, गणेश काळे, प्रेम नरेंद्र भाकरे, किरण पालवे, नाविन्या भाकरे, दीपक बेरड, आशिष भाकरे (सर्व रा. नवनागापूर) यांच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

 

सदरच्या गुन्ह्यात वाढीव मोक्का कलमान्वये करवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक भिंगारदिवे व गणेश काळे पसार होते. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, देवेंद्र शेलार, सागर ससाणे, रोहित यमूल यांच्या पथकाने अभिषेक व गणेश यांचा शोध घेतला. त्यांना नागापूर बस स्थानक परिसरातून ताब्यात घेत जेरबंद केले आहे.

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button