अहमदनगर

दिराकडून विनयभंग, पतीकडून मारहाण; विवाहितेची पोलिसांत धाव

सासरी नांदत असलेल्या विवाहितेचा दीराने विनयभंग केला. हा प्रकार विवाहितेने पतीला सांगितला असता पती, सासू-सासरे व दीराने तिच्यासह तिच्या आईला मारहाण केली.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू-सासरे व दीराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान विवाहितेच्या पतीनेही तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासू-सासरे व पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी विवाहिता घरातील किचनमध्ये एकटीच असताना तिच्या दीराने किचनमध्ये प्रवेश करून विनयभंग केला. दीराने केलेला प्रकार विवाहितेने पतीला सांगितला.

दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी विवाहितेच्या पतीने घरामध्ये सर्वांना एकत्र बोलून घेतले. त्यावेळी विवाहिता, तिचे आई-वडिल, पती, सासू-सासरे व दीर एकत्र जमलेले असताना विवाहिता व तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे.

तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पत्नीसोबत वाद सुरू असताना तिने फोन करून तिच्या आई-वडिलांना बोलून घेतले. तिचे आई-वडिल माझ्या घरी आले असता, आमच्या मुलीचे पैसे का घेतले?

आमचे पैसे देऊन टाका, असे म्हणून मला मारहाण केली असल्यचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून पुढील तपास सुरू केला आहे.P

Related Articles

Leave a Reply

Back to top button