अहमदनगर

तरूणाच्या खून प्रकरणी आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

नवनागापूर येथे भजे प्लेट वरून झालेल्या वादात पप्पु ऊर्फ प्रविण रमेश कांबळे (वय 35 रा. दत्त मंदिराजवळ, बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) या तरूणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली आहे.

त्यातील पसार असलेल्या आणखी एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल भाऊसाहेब साळवे (रा. वडगाव गुप्ता रोड, नवनागापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याला न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवनागापूर येथील रेणुका माता वडापाव सेंटरवर 26 एप्रिल रोजी प्रविण कांबळे याला मारहाण करण्यात आली होती.

दुसर्‍या दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना अटक केली आहे. अमोल साळवे पसार झाला होता.

सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप चव्हाण, किशोर जाधव यांनी आरोपी साळवे याचा इसळक (ता. नगर) परिसरात शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button