अहमदनगर

विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी साडेतीनशेहुन अधिक आरोपींचा शोध लावला

स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून विविध गुन्ह्यातील पसार व पाहिजे असलेल्या 358 आरोपींचा शोध लावला आहे.

विशेष बाब म्हणजे यामधील 245 जणांना प्रत्यक्ष अटक करण्यात आली असून 57 आरोपी यापूर्वीच अटक झालेले आढळून आले. तर 20 आरोपी मयत आढळले असून 37 आरोपींची न्यायालयातील खटले निकाली निघाले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

अधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार 9 ते 22 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी चार पथके तयार केली होती.

या पथकांनी मोक्का एक, पसार तीन, बंदी पसार दोन व पाहिजे असलेले 352 अशा एकूण 358 आरोपींचा शोध लावला. त्यातील 245 जणांना प्रत्यक्ष अटक करण्यात आली.

57 आरोपी यापूर्वीच अटक झालेले आढळून आले. 20 आरोपी मयत आढळले असून 37 आरोपींची न्यायालयातील खटले निकाली निघाले आहेत.

तसेच गुन्ह्यात पाहिजे असलेले, पसार व पॅरोलवरील आरोपी मोठ्या प्रमाणावर पसार होते. अशा चार हजार 444 आरोपींची यादी करण्यात आली होती. त्यातील एक हजार 197 आरोपींना दोन महिन्यांपूर्वीच्या मोहिमेत जेरबंद करण्यात आले होते.

तसेच काही आरोपी जागा बदलून व ओळख बदलून परजिल्ह्यात राहात होते. मात्र एलसीबीच्या पथकांना आरोपी सापडत असताना स्थानिक पोलिसांना ते का सापडले नाहीत,

त्यांच्याकडून कारवाई का झाली नाही, याबाबत खुलासा मागविण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button