घरात घुसून सास-सून व पतीला जबरदस्त मारहाण

शेतामधील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरून ७ जणांनी लाकडी काठी, दांडा आणि सस्टंप घेऊन घरात घुसून सासू सून आणि पतीला मारहाण केल्याची घटना दि 23 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
23 मार्च रात्री ९ च्यादरम्यान स्वाती सतीश गागरे आणि त्यांची सासू घरा मध्ये होत्या. त्यावेळी या मधील आरोपी हे लाकडी काठी दांडा आणि स्टंप घेऊन गागरे यांच्या घरामध्ये बेकायदेशीररित्या घुसले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही आमचं गिनी गवत का तोडलं असं म्हणून त्यांनी शिवीगाळ केली
यावेळी स्वाती गागरे यांचे पती सतीश अण्णासाहेब गागरे हे त्यावेळी तिथे आले त्यावेळी आरोपीने तिघांना लाकडी काठी,दांडा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीये घरामधील खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे
या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. स्वाती सतीश गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून अर्जुन सारंगधर कदम, सागर अर्जुन कदम, मनोज नानासाहेब कदम ,नितीन नानासाहेब कदम ,छाया अर्जून कदम, शांताबाई नानासाहेब कदम ,अर्जुन सारंगधर कदम यांची मुलगी आदी सात जणांवर मारहाण आणि जीवे मारण्याची आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करताय