Multibagger Share : ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांची केली चांदी ! 56 रुपयांवरून थेट 1000 वर उसळी; 1 महिन्यात FD च्या 10 पट पुढे…
या शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना थेट 56 रुपयांवरून 1000 चा लाभ मिळाला आहे.

Multibagger Share : शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा कमवणे अनेकांचे स्वप्न असते. मात्र सतत नशीब साथ देईल असे नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्याच्या शेअरबद्दल सांगणार आहे.
हा शेअर ऑरियनप्रो सोल्युशन्सचा आहे. या शेअरने अनेक महिने, वर्षे आणि आठवडे या कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अवघ्या एका महिन्यात हा शेअर 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेडचे शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत. या आयटी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या 3 वर्षांत शेअरची किंमत 1,439% पेक्षा जास्त वाढली आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक जून 2020 मध्ये 50-60 रुपयांच्या पातळीवर होता, पण आज 16 जून 2023 रोजी तो 1022 रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या Orionpro Solutions च्या शेअर्समध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज गुंतवणूक 18 लाख रुपये झाली असती. याच कालावधीत सेन्सेक्स 90 टक्क्यांनी वाढला आहे, तर या समभागाने अनेक पटींनी जास्त रिटर्न दिला आहे.
इतकेच नाही तर गेल्या एका महिन्यात हा शेअर 72 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 18 मे रोजी Aurionpro Solutions च्या शेअरची किंमत रु. 593 होती, पण 16 जून रोजी शेअर रु.1,022 वर बंद झाला आहे.
Aurionpro Solutions च्या स्टॉकमध्ये गेल्या 1 वर्षात 340% ची वाढ झाली आहे तर या वर्षी 2023 मध्ये हा स्टॉक 193% वाढला आहे. यासह, या फर्मचे मार्केट कॅप बीएसईवर 2,389.54 कोटी रुपये झाले.
त्याच वेळी, या IT सेवा फर्मने सांगितले की त्यांनी 2005 ते 2023 पर्यंत त्यांचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) 26% ने वाढवला आहे. कंपनीच्या मते, तिचा महसूल 2005 मध्ये 100 दशलक्ष रुपयांवरून 2023 मध्ये 6,590 दशलक्ष रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाशी संबंधित एक महत्त्वाचा सूचक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 85 वर आहे, जो सांगतो की स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेडिंग करत आहे, याचा अर्थ तो ओव्हरबॉट झाला आहे. तर, Aurionpro सोल्यूशन्सचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहेत.