ताज्या बातम्या

Multibagger Shares : गुंतवणूकदारांची होणार चांदी ! या शेअरने तीन वर्षांत दिला 1,500% रिटर्न; जाणून घ्या शेअरबद्दल…

या शेअरने गुंतवणूकदारांना चांगलेच श्रीमंत केले आहे. जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात जोरदार खरेदी झाली आहे.

Multibagger Shares : भारतीय शेअर बाजारात अनेकजण गुंतवणूक करत असतात व यातून मजबूत नफा मिळवत असतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

मात्र शेअर्सची स्थिती पहिली तर अनेक शेअर्स हे गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देतात कर काही शेअर्स गुंतवणूकदारांचा तोटा करतात. यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून पैसे कमवणे गरजेचे आहे. आज अशाच एका शेअरबद्दल आम्ही सांगत आहे जो गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे.

दरम्यान, जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात जोरदार खरेदी झाली. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये इंट्राडेमध्ये 8 टक्क्यांहून अधिक उसळी घेत रु. 1,040 चा स्तर गाठला आहे.

व्यापाराच्या शेवटी पाहायचे झाले तर कंपनीचे शेअर्स 4.46% वाढीसह 1,002 रुपयांवर बंद झाले. Gensol Engineering ही एक मल्‍टीबॅगर कंपनी आहे, जिने गेल्या साडेतीन वर्षांत त्‍याच्‍या गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 15 पटीने वाढवले ​​आहे.

FY2023 मध्ये, कंपनीचा एकूण महसूल वार्षिक 145 टक्क्यांनी वाढून 397.4 कोटी रुपये झाला. कंपनीचा EBITDA वर्षभरात 196 टक्क्यांनी वाढून 61.8 कोटी झाला आहे. याशिवाय, कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 125 टक्क्यांनी वाढून 24.9 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

18 ऑक्टोबर 2019 रोजी प्रथमच NSE वर Gensol Engineering च्या शेअर्सची खरेदी-विक्री सुरू झाली. त्यावेळी त्याच्या एका शेअरची किंमत फक्त 63.41 रुपये होती, जी आज 1,002 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या साडेतीन वर्षांत या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1,480.19 टक्के रिटर्न दिला आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने साडेतीन वर्षांपूर्वी शेअर्समध्ये सुमारे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक आजपर्यंत ठेवली असती, तर 1 लाख रुपयांचे मूल्य आज 1,480 टक्क्यांनी वाढून सुमारे 15.80 लाख रुपये झाले असते.

कंपनीच्या शेअर्सबद्दल सांगायचे झाले तर गेल्या एका वर्षात या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना 131.49 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच सुरुवातीपासून त्याचे शेअर्स सुमारे 1.17% ने घसरले आहेत. त्याचवेळी, गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे 6.00 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button